महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

‘समुद्र मंथन’ २३ – पहिला राष्ट्रीय समुद्रशास्त्र अभ्यासक मेळावा संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

गोवा / प्रतिनिधी – कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था  (सीएसआयआर-एनआयओ) ने पहिल्या ‘समुद्र मंथन’ 23 – पहिल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र अभ्यासक मेळाव्याचे आयोजन केले होते, ज्यात समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी 200 पेक्षा अधिक विद्वान,पोस्ट डॉक्टरल फेलो आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सीएसआयआर एनआयओ, गोवा येथील एस.झेड कासिम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाने समुद्रशास्त्राच्या जगात अतिशय महत्त्वपूर्ण असा मैलाचा टप्पा गाठला आणि आपल्या विशाल आणि गुंतागुंतीच्या समुद्राचे गूढ शोधण्यासाठी मान्यवरांना एकत्र आणले.

28 सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ. थम्बन मेलोथ उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारताच्या कानाकोपऱ्यातील अभ्यासक, नामवंत शास्त्रज्ञ आणि समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक उपस्थित होते.

एनआयओचे संचालक प्रा.सुनीलकुमार सिंह यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सरकारचे खोल महासागर मोहिमेचे लक्ष लक्षात घेता या मेळाव्याची कालबद्धता अधोरेखित केली. तरुण समुद्रशास्त्रज्ञांना या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यासपीठाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला, ज्यामुळे त्यांचे संशोधन नव्या उंचीवर पोहोचेल. सिंग यांनी देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांचे कौतुक केले आणि फलदायी आणि संस्मरणीय कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

एनआयओच्या विद्यार्थी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समुद्र मंथन’23 मासिकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉ.थम्बन मेलोथ यांच्या हस्ते करण्यात आले.आयोजन समितीचे संयोजक श्री. थावपांडियन पी. यांनी यशस्वी कार्यक्रमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »