नेशन मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून आज विविध विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर केले.सानुग्रह अनुदानात दोन हजार रुपयांनी वाढ केली. गेल्यावर्षी 16 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले गेले होते तर यावर्षी 18 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्याचबरोबर घनकचरा संबंधित स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चार प्रस्ताव सादर केले होते. त्या प्रस्तावाला काल मान्यता मिळाली असून ते 99 कोटींचे प्रस्ताव आहेत. त्यात सीएनजी, आरडीएफ सह इतर दोन प्रस्तावही झाले मंजूर झाले आहेत व लवकरच या कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.



