DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – सेवा पंधरवड्यात महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारण करण्यात आले. तर ५ हजार ५९० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. वीज बिलावरील नावात बदलाचे प्रलंबित सर्वच ७४६ अर्जांवर कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
२८ एप्रिल ते १२ मे दरम्यान सेवा हक्क पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल तसेच विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे आणि कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिले होते.
त्यानुसार कल्याण परिमंडलात नवीन वीजजोडणीचे ५ हजार ७३२ अर्ज प्रलंबित होते. यातील ५ हजार ५९० अर्जदारांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. तर वीज बिलावरील नावात बदल करण्याबाबतच्या सर्वच ७४६ अर्जांवर कार्यवाही करून सर्वच अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. महावितरणच्या पोर्टलवर आलेल्या १ हजार ६४४ ऑनलाईन अर्ज अथवा तक्रारींपैकी १ हजार ६१४ प्रकरणांचे निवारण करण्यात आले आहे.