महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई सीमा शुल्क विभागाकडून १६.८ कोटींची कीटकनाशकांची तस्करी उघड

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या एका महिन्यात, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), मुंबई विभागीय युनिटने चिनी पुरवठादारांच्या सक्रीय संगनमताने भारतात तस्करी होत असलेल्या कीटकनाशकांचे अनेक साठे जप्त केले.  ही तस्करी एका गटाद्वारे केली जात होती. यामध्ये ‘विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर’ अशा नावाने, क्लोराँट्रानिलिप्रोल, अबॅमेक्टिन बेन्झोएट इत्यादी नावाची कीटकनाशकांची तस्करी केली जात होती. या कारवाईत सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत सुमारे 16.8 कोटी रुपये किमतीच्या 30 मेट्रिक टन वजनाची  खेप (कन्साईन्मेंट) जप्त करण्यात आली. चाचणी अहवालात हा माल कीटकनाशक असल्याचे निश्चित झाले आहे. 

कीटकनाशकांच्या आयातीसाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाची कायदेशीर परवानगी आवश्यक आहे. कायद्या अंतर्गत, पुरवठादार/उत्पादकांसह आयातदाराला मंडळा द्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे. कीटकनाशके वापरण्यापूर्वी योग्य दर्जाच्या मानकांची पूर्तता सुनिश्चित  करण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. या सर्व गरजा तस्करांनी धुडकावून लावल्या. निकृष्ट कीटकनाशकांचा वापर निसर्गासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तसेच, जप्त करण्यात आलेली काही कीटकनाशके पेटंट उत्पादने होती आणि ती आयपीआर नियमांचे उल्लंघन करून आणली जात होती.

तपासादरम्यान, जप्त करण्यात आलेल्या काही पुराव्यांवरून असे दिसून येते अशा प्रकारची  तस्करी बऱ्याच काळापासून सुरू आहे. हा गट  चिनी पुरवठादारांच्या संगनमताने कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तस्करी सुलभ करण्यासाठी चिनी पुरवठादार हेतुपूर्वक, त्यांच्या कागदपत्रांमध्ये कीटकनाशकांना विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर म्हणून चुकीचे घोषित करत होते. तस्करी केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीतून मिळणारी अवैध रक्कम हवाला नेटवर्कद्वारे चिनी पुरवठादारांना पाठवली जात होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्यांनी यापूर्वी 300 मेट्रिक टन पेक्षा जास्त कीटकनाशकांची तस्करी केली आहे ज्याची अंदाजे किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. या प्रकरणांचा पुढील तपास सुरु आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »