महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी डोंबिवली रस्त्याकडे पालिका प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा होत होता. त्यामुळेच मागील दोन वर्षे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे या जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी पाठपुरावा केला. खासदार डॉ. शिंदे यांनी या रस्त्यासाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळवून दिला आणि त्यामुळेच हा रस्ता आता काँक्रीटचा होणार असून इतर चालण्यासाठी पदपथ अशा सुविधा मिळणार आहेत. काँक्रीटीकरणामुळे मुख्य म्हणजे आता पावसाळ्यात आता रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि रस्ता सुरळीत होणार असल्याचे वाहतूक कोंडी होणार नाहीत.

जुनी डोंबिवली येथील रेल्वे स्टेशनजवळील जोंधळे चौक ते जुनी डोंबिवली गांव रेल्वे अंडरपास अशा काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर विनिता राणे, गोपाळ लांडगे, भाऊसाहेब चौधरी, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, रणजित जोशी, वृषाली जोशी, अजय पांचाळ, आत्माराम नाटेकर, भाजपचे शशिकांत कांबळे, राहुल दामले, कृष्णा पाटील, समीर चिटणीस आदी उपस्थित होते.शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शहरातील गल्लोगल्ली सिमेंट काँक्रीट रस्ते आणि त्याचबरोबर मुख्य रस्ते काँक्रीटीकरण करण्यावर शिंदे यांनी भर दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यांच्या मंत्रालयामार्फत काँक्रीटीकरण रस्त्यासाठी वेगळा निधी दिला असल्याने आता शहरात सगळीकडे रस्ते चकाचक करण्यावर भर दिला जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »