महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई विमानतळावर ६.२ कोटी रुपये किमतीचे १०किलो सोने जप्त,दोन जण ताब्यात

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने 3 आणि 4  जून 2023 रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत 10 किलोग्राम सोने जप्त केले आहे. पहिल्या प्रकरणात शारजाहून मुंबईत एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट क्रमांक IX 252 ने आलेल्या दोन प्रवाशांना  विशिष्ट माहितीच्या आधारे, विमानतळावर थांबवण्यात आले. या प्रवाशांची तपासणी केल्यावर अंगाभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये  8 किलो वजनाचे 24 कॅरेटचे परदेशी शिक्का  असलेले सोन्याचे 8 बार सापडले. याविषयीच्या अधिक माहितीच्या आधारे तातडीने कारवाई  करत या प्रवाशाच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. 8 किलो वजनाचे 4.94 कोटी रुपयांचे सोने बारच्या स्वरुपात आढळले. पहिल्या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात दुबईवरून येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जून 2023 रोजी चौकशीसाठी थांबवण्यात आले आणि त्याच्या सामानाची तपासणी केली असता  56 लेडीज पर्स त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या.  या सर्व लेडीज पर्सच्या धातूच्या पट्ट्यांमध्ये चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात 24 कॅरट सोने लपवण्यात आल्याचे आढळले. ताब्यात घेतलेल्या या सोन्याच्या तारांचे निव्वळ वजन 2005 ग्रॅम होते आणि त्यांची अंदाजे किंमत सुमारे रु.1,23,80,875/- इतकी होती. या प्रकरणातील संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात वरवर पाहता सुशिक्षित व्यक्तींचा सोन्याच्या तस्करीचे नियोजन आणि कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळले.

या दोन्ही प्रकरणात गुन्हे करण्याचे पूर्णपणे नवे प्रकार दिसून आले, ज्यातून डीआरआय अधिकाऱ्यांना सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गटांच्या तपासणीमध्ये नियमितपणे निर्माण होत असलेली आव्हाने समोर आली.  परदेशी शिक्के असलेल्या आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात लपवलेले 24 कॅरट सोने,  सोन्याच्या तस्करीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामधली  ठळक घटना ठरली आहे.

या दोन्ही कारवाईत 6.2 कोटी रुपयांचे एकूण 10 किलो सोने जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रकरणांमध्ये 4 प्रवाशांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »