महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता चर्चेची बातमी

१ अब्ज ३२ कोटीचा इन्व्हॉईस घोटाळा, सूत्रधाराला सीजीएसटी भिवंडी विभागाकडून अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या ( CGST COMMISSIONRATE) अधिकाऱ्यांनी,  बनावट इन्व्हॉईस म्हणजेच मालपुरवठा देयक यादी तयार करणारे जाळे उध्वस्त केले आहे. या जाळ्याच्या माध्यमातून 1अब्ज 32 कोटी रुपयांचे इन्व्हॉईस जारी केले गेले आहेत, तसेच 23 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा (मालखरेदी वरील  करभरणा) गैरव्यवहार करण्यात आला आहे. यासंदर्भात भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने 9 सप्टेंबर 2022 रोजी एका व्यक्तीला, या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून अटक केली असून त्याची 23 सप्टेंबर 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने,  मेक्टेक स्टील ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, यु.जी.एस.के. ट्रेडर, वर्ल्ड एंटरप्राईजेस, रोलेक्स एंटरप्राईजेस, एच.एच.टी. एंटरप्राइजेस, तसेच यश एंटरप्राइजेस यासारख्या बनावट कंपन्यांच्या केलेल्या चौकशी अंती, आरोपी आणि या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आढळून आले.

मिळालेल्या विशिष्ट गुप्त महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारावर भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने आरोपीच्या निवासस्थान आणि परिसराची झडती घेतली. हा आरोपी वस्तू सेवा कर घोटाळ्याच्या आठ प्रकरणांच्या चौकशीसाठी हवा होता.

या आरोपीने, या बनावट कंपन्यांची संकेतस्थळे निर्माण करून त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारचा माल आणि सेवा पुरवठा न करता, एक अब्ज 32 कोटी रुपयांची बनावट इन्व्हॉईस तयार केली आणि 23 कोटी 16 लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा केला, असे तपासातून निष्पन्न झाले आहे.

36 बनावट केंद्रीय वस्तू सेवा कर कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या विविध विभागांमध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट गैरव्यवहार करण्याचे जाळे आपण निर्माण केल्याची कबुली देखील या आरोपीने दिली आहे.

तपासा दरम्यान मिळालेल्या परिस्थितीजन्य आणि वस्तुस्थितीदर्शक पुराव्यांच्या आधारावर, सदर आरोपीला 9 सप्टेंबर 2022 रोजी, केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत,  कायद्याच्या कलम 132 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

कर घोटाळा करणारे आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट जाळे चालवणाऱ्यांविरुद्ध, मुंबईचा केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग राबवत असलेल्या विशेष मोहिमेचा, ही कारवाई म्हणजे एक भाग आहे. भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने गेल्या एक वर्षात केलेली ही सतरावी अटक आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »