नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – जगभरात असे कुठलेच क्षेत्र नाही ज्यात भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला नाही. कृषी क्षेत्रापासून ते विज्ञानापर्यंत भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि हुशारीच्या जोरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. भारतात प्रतिभावान लोकांची अजिबातच कमी नाहीये. महाराष्ट्राच्या सुपुत्राने एक दमदार कामगिरी केली आहे. कारण महाराष्ट्रात बनवलेल्या 0.77 ग्रॅम इनडोअर रबर पॉवर फ्री फ्लाइट एरो मॉडेलची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
नागपूरच्या राजेश जोशी यांनी सर्वात हलके आणि रबराच्या ऊर्जेवर चालणारे इनडोअर रबर पॉवर फ्री फ्लाइट एरो मॉडेल तयार केले आहे. या विमानाचे नाव इंडिया बुक तसेच एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. राजेश जोशी हे एनसीसीमधून निवृत्त झाले आहेत. त्यांना लहानपणापासूनच एरो मॉडेलिंगची आवड होती. त्यामुळेच त्यांनी मुलांना एरोमॉडेलिंगबद्दल खूप ज्ञान दिले आहे. राजेश जोशी यांच्या मते तरुण पिढी ही एरोमॉडेलिंगच्या माहितीच्या अभावामुळे याकडे वळत नाहीत. पण मुलांनी एरोमॉडेलिंगवर लक्ष केंद्रित केले तर त्यांचा विमान वाहतूक क्षेत्रात जाण्याचा कल वाढेल, असे त्यांचे मत आहे.
कोरोनाच्या काळात जोशींनी सर्वात लहान एरो मॉडेल बनवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम, त्यांनी 120 ग्रॅम इनडोअर रबर पॉवर फ्री फ्लाइट एरो मॉडेल तयार केले. त्यानंतर 0.77 ग्रॅमचे मॉडेल बनवले आणि 4.5 सेमी लांबीचे इनडोअर एरो मॉडेल तयार केले. भारतात किंवा आशियात कोणीही असे इनडोअर विमान आतापर्यंत बनवलेले नाही. त्यामुळे जोशी यांनी हे मॉडेल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या दोन्ही पुस्तकांमध्ये नोंदणीसाठी पाठवले आहे. आत्तापर्यंत जोशी यांनी 77 ग्रॅम वजनाच्या छोट्या विमानापासून ते 21 फूट उंचीची आणि 60 किलो वजनाची विमाने बनवली आहेत. जोशी यांनी सांगितले की, जेव्हा हे इनडोअर रबर पॉवर फ्री फ्लाइट होते तेव्हा ते 30 फूट आणि 27 सेकंदांपर्यंत उडत होते. तसेच या मॉडेलमध्ये वापरलेले रबर हे जोशींना हवे होते ते आता त्यांना उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे हे मॉडेल ४५ सेकंदांपर्यंत उडू शकते.