महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
इतर ताज्या घडामोडी

डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या थाटात साजरी

DESK MARATHI NEWS.

डोंबिवली/ प्रतिनिधी -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज देशभरात साजरी होत असताना कल्याण-डोंबिवली शहरातही विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद अरुणोदय हायस्कूलजवळील गायकवाड वाडी मित्र मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात आणि फटाक्यांच्या आतिशबाजी करून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात लहान मंडपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची विधिवत धम्मपूजा करण्यात आली. उपस्थित नागरिकांसाठी मोफत स्नॅक्स आणि थंडगार पेय वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो धम्मबांधव, महिला, लहान मुले आणि नागरिक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांनी देखील थंड पेय आणि स्नॅक्सचा आनंद घेतला.

या मार्गावरून डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या विविध रॅलीमधील अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गायकवाड वाडी मित्र मंडळाच्या मंडपात भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.गायकवाड वाडी मित्र मंडळाचे उपक्रम, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणारे असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×