DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता आर्थिक भारा मुळे रडकुंडीला आली असतानाच त्यात भरीस भर म्हणून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारनेआता ५० रुपयांची वाढ केलेली आहे. केंद्रीय व राज्यातील सरकारने सर्वसामान्यांचे जगणं मुश्कील केले आहे असा आरोप करत दोन्ही सरकार विरोधात शिवसेना उबाठा गटाने मोठे निषेध आंदोलन केले आहे.
सातत्याने होत असलेल्या दरवाढी आणि महागाई मुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात यावी या करिता सरकार विरोधात घोषणा बाजी करीत डोंबिवली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक मच्छीमार्केट समोर रस्त्यावरच चूल मांडून महागाई विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख दिपेशजी म्हात्रे यांच्या आदेशानुसार आणि शहरप्रमुख प्रकाशभाऊ तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास चुल मांडुन, गॅसदरवाढ, महागाई, सरकारी धोरण आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या जाहीर निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली
शहर शाखेचे, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख , महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिकांनी विशेषतः महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.