DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, भक्तीचा आधार नवरात्रोत्सवानिमित्त प्राथमिक विद्यामंदिर, कर्णिक रोड, कल्याण येथे “सन्मान नवदुर्गाचा” हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व देवी पूजनाने झाली. तूच दुर्गा तू भवानी या गीतावर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व वातावरण भक्तिमय बनवले. शाळेतील विद्यार्थिनींनी रंगतदार सुरुवात करून सर्वांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून नारीशक्तीचे महत्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी सक्षम योगदान दिले असून त्यांचा सन्मान हा केवळ गौरव नसून पुढील पिढीसाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय महेश देशपांडे सर प्रमुख पाहुण्या आदरणीय वर्षाताई कोल्हटकर सहाय्यक शिक्षिका उर्मिला जाधव मॅडम, शालेय समिती सदस्य लक्ष्मण जी अग्रवाल, वसुधा पवार मॅडम, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सय्यद मॅडम पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका साबळे मॅडम मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गा डॉक्टर इटकर मॅडम, सौ सुधा जोशी मॅडम, सौ मंजिरी फडके मॅडम, स्वामिनी निष्कलानंदा (अम्माजी), सौ शिल्पा सदाशिव चव्हाण मॅडम, सौ सीमा समीरगांगुर्डे मॅडम, सौ. मीनल पराग जोशी मॅडम, सौ दीपिका संताजी साळवे मॅडम, श्रीमती पुष्पा पाडवी मॅडम सौ आदिती चौधरी यांचा त्यांच्या कार्याची ओळख करून घेतली आणि सत्कारपूर्वक सन्मानपत्राने गौरविण्यात आले. या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून शाळेच्या पुढाकाराचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवर, पालक व नागरिकांच्या सहकार्याने “सन्मान नवदुर्गाचा” हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय वेदपाठक मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम उत्तम पद्धतीने संपन्न झाला.



