डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत युवासेनेने सायकल रॅली काढून आपला निषेध व्यक्त केला. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे डोंबिवली पूर्वेतील शहर शाखेपासून ते गणपती मंदिरापर्यंत निघालेल्या या सायकल रॅलीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यामुळे या सायकल र
इंधन दरवाढीविरोधात युवासेनेतर्फे आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज डोंबिवली शहरातही युवा सेनेतर्फे सायकल रॅली काढत महागाईसंदर्भातील केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या रॅलीमध्ये अनेक युवासैनिक सायकल घेऊन सहभागी झाले होते. तर 2 बैलांना जुंपलेली मोटार आणि सायकलला जोडण्यात आलेल्या मोटारसायकलचे पार्ट या रॅलीत लक्ष वेधून घेत होत्या. त्यासोबतच रॅलीमध्ये रावण आणि यमदेखील सहभागी झालेले दिसून आले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि विविध बॅनर्स रॅलीमध्ये झळकत होते.
डोंबिवली शिवसेना शहर शाखा ते गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेनेचे जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, उपजिल्हाधिकारी आशु सिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.