नेशन न्यूज़ मराठी टिम.
सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहरातील १०० खाटांचे सामान्य रुग्णालय आणि १०० खाटांचे महिला -शिशू रुग्णालय हे फर्निचर आणि निधी अभावी अद्याप सुरु झालेल नाही.हे नविन शासकीय रुग्णालय तात्काळ सुरु करण्यात यावं या मागणीसाठी सोलापूर युवक काँग्रेस कडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेला गाजरांचा हार घालत त्यांचा निषेध युवक काँग्रेसकडून करण्यात आला.आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ निधी मंजूर करून रुग्णालय सुरु करावे अन्यथा त्यांचा ताफा आडवून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसने दिला आहे.