महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

२०२४ नंतर दिल्लीतूनही फंड आणू शकाल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली– सध्याच्या महाविकास आघाडीच्या काळात एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतोय. 2024 नंतर तसा दिल्लीतूनही आपण फंड आणू शकाल असे सूचक विधान करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील टप्पा क्रमांक 1 आणि 2 मधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे भूमीपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून मंजूर निधीतून हे रस्ते केले जाणार आहेत.

महाराष्ट्रात 51 टक्के शहरीकरण झाले असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः एमएमआर रिजनसाठी फंड किती उपलब्ध होतोय हा एक प्रश्न असायचा. पण आता जसा आपण इकडे फंड आणतोय तसा यापूर्वी कधीही आणू शकलो नाही अशी आठवण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तर निधी येत असल्याने सध्या शुभेच्छा तर येतच आहेत, फंडही येतोय. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कल्याण डोंबिवलीकडे बारीक लक्ष आहे, कारण घरी आईकडूनही सतत सांगितले जाते की कल्याण डोंबिवलीला फंड द्या. त्यामुळे आपण हक्काने सांगू शकतो की जशी मुंबई माझी आई आहे तशीच कल्याण डोंबिवली आपली मावशी आहे असे प्रांजळ मतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. इकडे जसा निधी येतोय त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तेवढीच मेहनत घेतली आहे. ते अविश्रांत अशी मेहनत घेत असल्याने इकडे जो कामाचा धडाका लागला आहे तो तुफान आहे असे गौरवोद्गारही आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले

दिल्लीतूनही फंड आला पाहीजे. 2-3 दिवसांपूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो. आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढवणार आहोत. जसा निधी आपण सध्या महाराष्ट्र सरकारमधून आणतोय 2024 नंतर दिल्लीतूनही तसाच निधी आणू शकाल असे सूचक विधानही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उद्देशून केले. तसेच आदित्य ठाकरे यांनी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुरू असणाऱ्या विविध विकासकामांचा उल्लेख करत त्यांच्या कामाचेही कौतूक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×