प्रतिनिधी.
मुंबई – भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. दि.26 जानेवारी 2021 पासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले असेल. या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चाफेकर बंधूंना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांनासुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. दि. 26.11.2008 रोजीच्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबलासुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली.

शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच ‘जेल पर्यटन’ सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे.
हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल.पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल.
सदरील अर्ज अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर करावा. येरवडा कारागृहाचा संपर्क क्र.020-26682663/020-29702586 आहे. संपर्कासंदर्भात काही मुद्दा असल्यास भेट देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र.9823055177 यावर संपर्क साधावा. पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींनी आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तू कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडिओग्राफीची व्यवस्था केलेली असून ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. तथापि, कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल.
तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल असे श्री. देशमुख यांनी सांगितले
Related Posts
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
येरवडा मध्यवर्ती कारागृहास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
पुणे/प्रतिनिधी- महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर…
-
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर…
-
भारतातील वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचा पर्यटन विकास महामंडळासोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आयुर्वेद आणि इतर…
-
महाडीबीटी पोर्टल,अर्ज भरण्यास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी. अलिबाग - कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
जानेवारी २०२४ पर्यंत भारतीय रेल्वेची १२९७.३८ टन मालवाहतूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या…
-
कल्याणात सिग्नल मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई, २६ जानेवारी अंमलबजावणी
प्रतिनिधी. कल्याण - गेल्या काही महिन्यांपासून कल्याणात प्रायोगिक तत्वावर सुरू…
-
कोल इंडिया लिमिटेडकडून वापर नसलेल्या 30 खाण क्षेत्रांचे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोल इंडिया लिमिटेड…
-
१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या…
-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारी रोजी‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण…
-
कल्याणात २८ आणि २९ जानेवारी दरम्यान जागतिक दर्जाचे 'सायन्स कार्निवल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आपल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांसाठी…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
नवी दिल्लीत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ट्रॅव्हल मार्ट २०२३चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारच्या पर्यटन…
-
मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या…
-
१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला ३० जानेवारी पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 141 कोळसा खाणींसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची सहावी फेरी आणि त्यासाठीच्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरू केली होती. उद्योग क्षेत्राकडून असलेली कोळशाची मागणी लक्षात घेऊन तसेच व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने यापुढे, परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठीची पहिली तपासणी उजळणी ही, संबंधीत खाणी खुल्या करण्याची परवानगी दिल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता निविदेशी निगडीत कागदपत्रांमधील तरतुदींनुसार, यशस्वीरित्या लिलाव झालेल्या प्रत्येक कोळसा खाणीसाठी, सादर कराव्या लागणाऱ्या परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये, दरवर्षी त्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाच्या आधारे तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे. 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींसाठी पहिला लिलाव सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत दुप्पटीने वाढ झाली आहे, ही बाब लक्षात घेऊनच परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये शिथीलता मिळावी यासाठी, कोळसा मंत्रालयाला उद्योगक्षेत्राकडून असंख्य निवेदने प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे, ज्या निवीदा यशस्वीपणे स्विकारल्या गेल्या आहेत आणि कार्यवाहीच्या बाबतीत त्यांच्या खाणी या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधीच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशांवरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि या सगळ्यामुळे खाणी कार्यान्वित करण्याच्या कामांसाठी निधी कसा उपलब्ध करावा, ही नवी समस्या निर्माण झाली असल्याचे या निवेदनांमध्ये म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अशा निविदाधारकांवरील आर्थिक भार कमी करण्याकरता गुंतवणूकदाराभिमुख उपक्रम वा उपाययोजना राबवावी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याद्वारे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावात निविदाधारकांचा सहभागही वाढेल असे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या लिलाव फेरीत ही नवी सुधारणा लागू करता यावी यासाठी कोळसा मंत्रालयाने, लिलावासाठीची अंतिम तारखेला मुदतवाढ देत, ती आता 13 जानेवारी 2023 ऐवजी 30 जानेवारी 2023 अशी केली आहे.
-
पर्यटन संचालनालच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र…
-
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक कुडे प्राचीन बौध्द लेण्यांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता
अलिबाग/प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द…
-
४ ते ६ जानेवारी रोजी "मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा, साहित्य, संस्कृती…
-
गृहनिर्माण संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहीम
संघर्ष गांगुर्डे मुंबई - राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता…
-
‘मधाचे गाव पाटगाव’ ठरले सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेतील कास्य पदकाचे मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
२ ते ९ जानेवारी दरम्यान कोकण प्रांतातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्येंत बालकांसाठी विशेष गोवर लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळसा आयातीत २२.७३ मेट्रिक टनांपर्यंत घट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशांतर्गत कोळसा उत्पादन…
-
मुंबईत ५ ते ९ जानेवारी दरम्यान इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने…
-
पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…