नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार रोखण्याकरिता तसेच लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले. या प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांना रास्त भाव धान्य दुकानामार्फत ईपॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वितरण करण्यात येते. यवतमाळ जिल्हा हा सर्व योजनांच्या ६ लक्ष १० हजार ७६८ शिधापत्रिकांमधील २२ लक्ष ७७ हजार ३१० लाभार्थाची १०० टक्के आधार जोडणी करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेमध्ये प्रती कार्ड ३५ किलो व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. अपात्र शिधापत्रिकांमधील लाभार्थ्यांचा शोध घेऊन वगळणी करणे व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करणे ही पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणारी निरंतर प्रक्रिया आहे. मे २०१८ मध्ये आधार संलग्न सार्वजनिक वितरण प्रणाली संपूर्ण राज्यात यशस्वीपणे सुरू करण्यात आली. या नवीन प्रणालीमुळे १०० टक्के धान्याचे वितरण आधार सत्यापन करून होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मयत व्यक्ती, दुबार नोंदी, स्थलांतरित कुटुंबे, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, विवाहित मुली आदींचा शोध घेऊन निकषात न बसणाऱ्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र करण्यात आल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्याला ७ जिल्हे आणि एका राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे इतर जिल्हा आणि राज्यातील शिधापत्रिकांचा शोध घेण्याचे जिकिरीचे काम जिल्हा पुरवठा विभागाने पार पाडले. यात २ हजार ३८३ शिधापत्रिका नक्कल आढळून आल्यात त्यापैकी १२९२ रद्द केल्या तर १०९१ तपासणीअंती राखून ठेवण्यात आल्या आहेत. यातही यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत तर या कामात इतर कोणताही जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या आसपासही नाही.
शिधापत्रिका आधारकार्ड सोबत संगणकीकरण करणे हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून याद्वारे उपलब्ध झालेला इष्टांकाचा वापर नवीन शिधापत्रिका मधील लाभार्थी तसेच विभक्त कुटुंबे यांना अन्नधान्य देण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा हा सर्व योजनांच्या ६,१०,७६८ शिधापत्रिकामधील २२,७७,३१० लाभार्थाची १०० टक्के आधार जोडणी करणारा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.
शिधापत्रिका -आधार संलग्नीकरणाची फलश्रुती म्हणून अन्न धान्याचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत खात्रीशीर पोहचत असून धान्याचा गैरव्यवहार व अपहार यास आळा बसला आहे. याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना धान्य न मिळणे यासारख्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
Related Posts
-
बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - शैक्षणिक जीवनात बारावीची…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
मराठवाड्यात नवजात बालकांचा आधार ठरणार मानवी मिल्क बँक
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी -बदलत्या जीवनशैलीचा परिणाम…
-
ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा- युआयडीएआय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एखाद्या व्यक्तीची ओळख…
-
यवतमाळ जिल्हाधिका-यांनी घेतली मान्सुनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . यवतमाळ - मान्सुनच्या काळात जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी, पूर…
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
बार्टीच्या ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मारली बाजी
मुंबई/प्रतिनिधी - लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
-
मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
आजचा निकाल म्हणजे कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या थोबाडीत मारली - अमोल मिटकरी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/U4Rhi3A-ue4 अकोला/प्रतिनिधी - आज कर्नाटकच्या निवडणुकीचा…
-
ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऑनलाईन…
-
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, तिवरंग येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी टिम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात 21 व…
-
आता मतदार कार्ड होणार 'आधार' शी लिंक, १ ऑगस्टपासून विशेष मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…
-
दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी -युआयडीएआयचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्या राहिवाशांना दहा…
-
आधार कार्ड संबंधीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट करा ‘आधार’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील पहिले आधार कार्ड…
-
जिजाऊच्या अंध व मतीमंद शाळेतील अंध मुलींनी राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात मारली
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/प्रतिनिधी - विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड हायस्कूल…
-
यवतमाळ पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई
प्रतिनिधी. यवतमाळ - दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा…
-
निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी,यवतमाळ, हिंगोली,नांदेड जिल्ह्यांना होणार लाभ
मुंबई/प्रतिनिधी - निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास…