दौंड/प्रतिनिधी– दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांसह पोलिस यंत्रणाही भांबावून गेली आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी यवत पोलिसांनी कंबर कसली त्यातच यवत पोलिसांच्या एका पथकाच्या हाती एक दुचाकी चोरटा लागला.त्याच्याकडून तीन दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहे. सतीश बाबासाहेब कुल राहणार राहु ता.दौंड जिल्हा पुणे त्याच्याविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी गुप्त माहितीवरून सतीश कुल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार रमेश कदम व पोलिस नाईक अजिंक्य दौंडकर यांनी विशेष परिश्रम घेऊन आरोपी सतीश कुल यांची उचल बांगडी करून गुन्हा कबूल करण्यात यश संपादन केले. या कामगिरी बद्दल पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती,उपविभागीय पोलिस अधीक्षक राहुल धस दौंड व यवत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
- June 9, 2021