नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – विदर्भात सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या सभे दरम्यान राणा दांपत्य व यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चिखलफेक झाली. त्यावर बच्चू कडू ह्यांनी राणा दांपत्याला देवेंद्र फडवणीस यांनी आवर घालावा असे वक्तव्य करत ह्या वादात उडी घेतली होती त्यावर रवी राणा यांनी कडू यांना उद्देशून माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिल्या तेव्हा राणा म्हणाले मला आवर घालण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी देऊ नये. खर तर बच्चू कडू यांनाच आवर घालण्याची गरज आहे.
बच्चू कडू हेच मंत्रिपदासाठी सरकारला ब्लकमेल करतात. देवेंद्र फडणवीस सोबत मी अवघ्या अकरा बारा वर्षापासून आहे. आम्ही सुखदुखात सोबत राहणारे व्यक्ती आहोत. आम्ही पळ काढणारे व्यक्ती नाही. बच्चू कडू घडीत इकडे घडीत तिकडे असतात. निवडणूकी मध्ये हे सर्वच नेते माझ्या विरोधात असतात. असे राणा म्हणाले.
यशोमती ठाकूर राणा दांपत्यावर शंभर कोटींचा दावा ठोकणार असे म्हटल्या होत्या. त्यांची नोटीस आम्हाला मिळाली नाही नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देऊ असेही राणा म्हणाले.