महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

‘ॲसिड’ चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – स्त्रीच्या सौंदर्यात भर टाकतो तो तिचा गोजिरवाणा चेहरा. पण जर एखाद्या स्त्री ने पुरुषाला नकार दिला किंवा कोणत्याही वादामुळे प्रतिशोध घेण्याच्या हेतुतून समाजातील काही विक्षिप्त लोक स्त्रियांवर ॲसिड हल्ला करतात. अशा अगणित घटना देशात आजवर घडल्या आहेत. पण जर ॲसिड हल्ला झालेल्या स्त्रीच्या या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेतला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा अल्ट्रा झकास घेऊन आली आहे. दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास(Ultra zakas) या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

केरळमधील ॲसिड(Acid) हल्ल्यातील गुन्हेगार राज्याच्या विविध भागातून बेपत्ता होतात. ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या मुलींच्या घरासमोर या गुन्हेगारांना त्यांच्या कापलेल्या लिंगासह टाकण्यात येते. या वारंवार घडणाऱ्या घटना समाजात व्हायरल होतात आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागतात. मात्र ही कृत्ये करणाऱ्या अज्ञात कोण आहे याचा सुगावा लागत नाही. नेमका कोण असेल हा अज्ञात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपट हा मूळ मल्याळम भाषेत असून याचे मराठी रूपांतर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

“समाजात विक्षिप्त मानसिकतेचे लोक आणि त्यांचे विक्षिप्त कृत्य मनाला हेलावून टाकणारे असतात. समाजातील ही विक्षिप्तता दाखवणारा ‘ॲसिड’ (आघात) चित्रपट प्रेक्षकांना सादर करून जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Related Posts
Translate »