Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे/प्रतिनिधी – कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीच्या वतीने यशदा अकादमी, पुणे येथे दिनांक २६ एप्रिल व २७ एप्रिल २०२३ रोजी ०२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून यशदा चे महासंचालक एस. चोक्कलिंगम (भा. प्र. से) उपस्थित होते.तसेच कामगार राज्य विमा महामंडळ, मुख्यालय, नवी दिल्ली तील सह संचालक एम जॉर्ज व उप प्रादेशिक कार्यालय,पुणेचे कार्यालयप्रमुख तथा उप संचालक प्रभारी हेमंत कुमार पांडेय मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन दिनांक 26 एप्रिल 2023 मुख्य अतिथी चोक्कलिंगम यांच्या हस्ते करण्यात आले.

उदघाटन पर भाषणात चोक्कलिंगम यांनी ज्ञानाचे महत्व सांगितले तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थिंना नियम आणि नियमांबद्दल ज्ञान प्राप्त करून व्यवस्था, विभाग आणि लोकांच्या सेवेसाठी अपरिहार्य बनण्याचा आग्रह केला. त्यांनी हेही सांगितले की नियमांचे पालन करतानाच लोकांचे जीवन सोपे करणे महत्वाचे आहे. त्यांनी सांगितले की ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग करून आपण लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो.

या प्रशिक्षण कार्यक्रमात पश्चिम विभागातील -महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि राजस्थान मधून 56 अधिकारी आणि कर्मचारी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
व्याख्याते म्हणून महामंडळातील वित्त विभागाचे अनुभवी अधिकारी मुख्यालय,नवी दिल्ली तील संयुक्त संचालक एम. जॉर्ज, उप प्रादेशिक कार्यालय, सूरत चे कार्यालय प्रमुख दीपक मलिक, उपप्रादेशिक कार्यालय पुणे चे कार्यालयप्रमुख श्री हेमंत कुमार पांडेय, उप प्रादेशिक कार्यालय, उदयपुर चे कार्यालय प्रमुख राजीव लाल, मुख्यालय नवी दिल्ली तील उपसंचालक राकेश चौहान, प्रादेशिक कार्यालय, कर्नाटक तील उपसंचालक (वित्त) सुनील महतो यांचा समावेश होता.या व्याख्यात्यांनी महामंडळातील वित्त विभागाशी संबंधित विविध विषयांवर व्याख्यान दिले. सोबतच ओपन सेशन मध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्न व शंकाचे निराकरण करण्यात आले.

प्रशिक्षणाचा समारोप दिनांक 27 एप्रिल रोजी करण्यात आला.कार्यक्रमाच्या समारोप भाषणात पांडेय यांनी व्याख्याते, प्रशिक्षणार्थी आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच या प्रशिक्षणा दरम्यान जे ज्ञान मिळवले त्याचा प्रशिक्षनार्थी कार्यालयीन कामकाजामध्ये सुयोग्य उपयोग करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थिंना प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X