नेशन न्यूज मराठी टीम.
अलिबाग/प्रतिनिधी- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.
कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध व्यावसायिक जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.गडकरी म्हणाले, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
यावेळी त्यांनी 13,000 कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल.
1,200 कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि 1,146 कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.
श्री.गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
“मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी 2011 मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत.
आता महामार्गाचे 11 टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल” असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना 6-8 इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरुन हे रस्ते किमान 50 वर्षे टिकतील, तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल.
“भारतात वर्षाला 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी 1.5 लाख प्राणघातक असतात, त्यापैकी बरेच जण 18-34 वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
मंत्री गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.
रायगड जिल्हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. तसेच कोकणातील सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, शासन, लोकसहभाग आणि खाजगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा. या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे, त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकाला रोजगार मिळेल,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे,खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांची समयोचित भाषणे झाली. या सर्वच मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाप्रति असलेली निष्ठा सर्वांनीच आदर्श घ्यावा,अशी असल्याचे मत व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्यांनी जिद्दीने हाती घेतल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 414.68 कोटी किमतीच्या 63.900 किलोमीटर लांबीच्या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन डिजिटल पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ध्वनीचित्रफित सर्वांना दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. आभार प्रदर्शन यशवंत घोटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले.
Related Posts
-
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार - मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादनाकडे वळण्याची गरज - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कृषी उत्पादन संस्थाचे काम…
-
महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्युज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी- महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/प्रतिनिधी - पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती…
-
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला दिली भेट
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने ६१ .५८६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
प्राध्यापक संघटच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…