मुंबई/ प्रतिनिधी – दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचा निर्णयही श्री.मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Related Posts
-
दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
इटीसी केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 19…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
ठाणे परिवहन सेवेच्या १०बसेस कोरोना संकटकाळात रुग्णवाहिकेची देणार सेवा
प्रतिनिधी . ठाणे - कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या…
-
सोलापूरच्या मनोज धोत्रेची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात एण्ट्री
सोलापूर/अशोक कांबळे - बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारतीय…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
कोरोना निर्बंधांचे पालन न केल्याप्रकरणी डोंबिवलीत डी मार्ट महापालिकेकडून सील
डोंबिवली प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालपासून…
-
२८ ऑगस्टपर्यंत दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय…
-
उदघाटन समारंभ बाजूला ठेवून कोरोना रुग्णासाठी दिले स्वताचे हॉस्पिटल
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण प्रतिनिधी- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
दिव्यांगतेवर मात करत असंख्य दिव्यांग,निराधार महिलांसाठी दीपस्तंभ बनलेली हिरकणी
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/ngITOEJletE चाळीसगाव/प्रतिनिधी- चाळीसगाव येथील ''स्वयंदीप' संस्था…
-
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, न्यालयाकडून आरोपीस २० वर्षाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/K5hZvX2sg00?si=U-AmE-Gv_t61GcCS बुलढाणा/प्रतिनिधी- मानसिक दृष्टया दिव्यांग असलेल्या…
-
भिवंडीतील कोरोना योध्यांचा केद्रिंय मंञी कपिल पाटील यांचे हस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी - भिंवडी तालुक्यातील पडघा येथे कोरोना काळात जिवावर उदार…
-
आता आशा स्वयंसेविकांना ही कोरोना चाचणीचे प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी…
-
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक
कल्याण प्रतिनिधी- सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या…
-
कल्याण पूर्वेत लग्न समारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचा सर्वसमावेशी दृष्टीकोन : नवोन्मेषी उपक्रमांद्वारे जीवन परिवर्तन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रतिनिधी - भारतातील…
-
जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर / विक्रमगड/प्रतिनिधी - जिजाऊ शैक्षणिक…
-
केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, आमदारांच नियम पाळण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये गेल्या…
-
कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार
पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…
-
कल्याण मध्ये कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड
कल्याण/प्रतिनिधी - कोरोना टेस्टच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे…
-
कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन
कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…