महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी मुंबई

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु

प्रतिनिधी.

मुंबई – राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते.

नगरविकासमंत्री श्री.शिंदे म्हणाले, लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Related Posts
Translate »