नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मधील बेतुरकर पाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या तीव्र बनली आहे. सातत्याने कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ,दूषित पाणी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणच्या पाईपलाईन बदलण्यात आल्या नसल्यामुळे ही समस्या भेडसावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाणी समस्येबाबत अनेकदा आंदोलने, निवेदने देऊनही महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता राणी कपोते यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांनी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हंडा कळशी घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच उपोषण सुरू केलं आहे .जोपर्यंत पाणी समस्येबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे महिलांनी सांगितले.