नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र रूप धारण करू लागलाय. विविध राजकीय पुढारी घटनास्थळी जावून उपोषणकर्ते मनोज जरंगे ह्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. मराठा समाज एकवटून वेगवेगळ्या शहरात आंदोलन करत आहेत. बीड जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले आहे.
बीडमध्ये काही महिलांनी भर पावसात स्वतःला जमिनीत गाडुन घेत मराठा आरक्षणाची मागणी केली. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला होता. परंतु प्रशासनाने मध्यस्थी करत यांचे निवेदन स्वीकारले यानंतर या महिलांनी आंदोलन मागे घेतले.