नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – ऐतिहासिक कल्याण शहाराच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात एका मजुर महिलेला रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्या महिलेला रूग्णालयाच्या गेट बाहेरच बाळाला जन्म द्यावा लागला. एका महिला भगिनीवर अशी वेळ येणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना भेटून चांगलेच धारेवर धरले व जाबही विचारला आहे. त्या महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारा अभावी मृत्यू झाला असता तर त्याची जबाबदारी रूग्णालयाच्या अधिकाऱ्यानी घेतली असती का? किंवा प्रशासनाने घेतली असती का? असा सवाल यावेळी त्यांना करण्यात आला.
त्याच प्रमाणे अशा लाजिरवाण्या घटना पुन्हा घडू नये त्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे अशी समजही यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. त्याच बरोबर गरीब गरजू रुग्णाना रूग्णालयाच्या अशा वागणुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो त्यांची वेळोवेळी गैरसोय होते.प्रसंगी जीवावर सुद्धा बेतू शकते त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे व्हा अन्यथा वंचित कडून तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कल्याण,मुरबाड,शहापूर तालुक्यातून येणाऱ्या गरिब रुग्णाच्या हलगर्जी बाबत जाब विचारण्यासाठी व त्या निंदनीय घटनेचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा मा.मायाताई कांबळे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महिला आघाडी महासचिव मा.रेखा ताई कुरवारे,कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष मा.संतोष गायकवाड व कार्यकर्यांनी रूग्णालयाच्या अधिकाऱ्याना धारेवर धरून जबाबदार अधिकारींना निवेदन देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
यावेळी महासचिव वैशाली कांबळे,उल्हासनगर शहर अध्यक्षा मा.रेखाताई उबाळे,वार्ड अध्यक्षा संगीता ताई माने मोहाने,कल्याण पूर्व अध्यक्षा मा.ललिता आखाडे,सचिव ईशा जाधव,बदलापूर शहर अध्यक्ष काजल यादव,युवा कार्यकर्ते मा.ॲड.प्रशांत जाधव,वार्ड अध्यक्ष मा.नितिन भालेराव, वार्ड उपाध्यक्ष मा.मुकेश चौथमल, कार्यकर्ते मा.तात्या केदार,युवा कार्यकर्ते प्रकाश घोंगडे, सुमित ठोकळ,युवा कार्यकर्ते शहाशवाज शेख,कल्याण पश्चिम तालुका उपाध्यक्ष मा.सुनील शहा,मोहणे शहर अध्यक्ष मा.किरण शेंडगे,कल्याण पूर्व तालुका उपाध्यक्ष राजेश पवार युवा कार्यकर्ते यासिम बिजले युवा कार्यकर्ते छोटूभाई मा.राजेश ओव्हाळ अध्यक्ष ९. वार्ड, वार्ड अध्यक्ष मा.अनिल गायकवाड,युवा कार्यकर्ते मा.भैयासाहेब कसबे,सचिव मा.शशिकांत भोईर व वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्ह्याचे व कल्याण उल्हासनगर शहराचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.