नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्याच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी) रुग्णालयात सफाई कामगार महिला कर्मचाऱ्यांरी म्हणून एकूण 117 कंत्राटी कर्मचारी काम करतात. महागाईच्या काळात कमी वेतनावर काम करूनही महिला कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या कर्मचाऱ्यांमध्ये विधवा, निराधार व अपंग महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि घर भाडे देणे शक्य नसल्यामुळे महिला कंत्राटी कर्मचारी त्रस्त आहेत.या महागाईच्या काळात वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे जगाव कस हा प्रश्न या कामगारांना पडला आहे. सफाई कामगार कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून वेतन न मिळाल्याने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी) रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारापुढे आंदोलन सुरू करण्यात आले.
प्रत्येक वेळी जो पर्येंत आंदोलन करत नाही तो पर्येंत आमचे वेतन होत नाही. प्रत्येक वेळी आमच्या मेहनतीच्या पगारासाठी आम्हाला आंदोलन करावे लागते, त्यामुळे आम्हाला व आमच्या कुटुंबाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. असे आंदोलन करणाऱ्या एका महिला सफाई कर्मचारी यांनी माध्यमांना सांगितले.



