Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

तासाभरात रिक्षात विसरलेले महिलेचे ७ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी दिले मिळवून

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – लग्न समारंभ आटोपून कुटुंबीय रिक्षाने घरी परण्याच्या वेळी मात्र दागिन्यांची बॅग रिक्षात राहिली .रिक्षाचा नंम्बर नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले .पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने रिक्षा शोधून काढली आणि महिलेचे सात तोळ्याचे दागिने तिला परत केले .अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसाचे आभार मानले

डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते .या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते .लग्न समारंभ आटोपून रात्री नऊच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर पोहचले .तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली .त्याना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला .घरी गेल्यानंतर त्याना 7 तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता .गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंम्बर नव्हता त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली .मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला .स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले .या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली .रिक्षाच्या व्ह्यूड वर पांढर्या रंगाची पट्टी होती .रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला .आधी रिक्षा चालकाने मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दागिने परत केले .आज पोलिसांनी गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X