नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – राहुल गांधी यांनी घर बांधून दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आल्या होत्या. कलावंती या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
यावेळी त्यांनी निवडणूकीत राहुल गांधी यांचा प्रचार करणार, मोदी सरकारचा प्रचार करणार नाही असे विधान केलं आहे. सर्व घर व मुलांचं शिक्षण राहुल गांधी यांनी करुन दिलं. त्यांनी सगळा खर्च केला. अमित शहा खोटं बोलले, त्यांना माहिती असूनही ते खोटं बोलले तर मोदी सरकारने माझं काहीचं केलेलं नाही, असा पुनरुच्चार कलावंतीनी केला आहे.