नेशन न्यूज मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – आपला देश जरी चंद्रावर पोहचला असला तरी मनुवादी मानसिकता या देशातून संपण्याचे नाव घेत नाही आहे. रोज जातिवादाच्या नावाखाली देशात कुठे ना कुठे संपूर्ण मानवजातीला लाजवेल अश्या घटना घडत आहेत.बहुजन समाजावर जातीय आत्याचाराने देश होरपळून निघताना दिसत आहे. त्यातच अहमदनगर जिल्हात श्रीरामपूर गावत दलित आत्याचाराची एक घटना घडली आहे .समाज माध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर या घटनेची दाहक किती क्रूर आहे याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे.या घटनेच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथील व्यवस्थेला एक सवाल केला आहे.
महाराष्ट्रातील अजून एक दिवस आणि अजून एक जातीय अत्याचार ! एक दलित युवक हात जोडून गयावाया करून स्वतः निर्दोष असल्याचे सांगताना दिसतोय. हा व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आहे. तीन दलित युवकांना कबुतर चोरल्याचा संशयावरून, झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आली.
हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. तीन दलित मुलांना ‘शिक्षा’ देण्याचा अधिकार आपल्याला आहे ही मानसिकता इथल्या जातीय व्यवस्थेनेच जोपासली आहे.
इतर कोणाला कबुतर चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष मारहाण झाली असती ??
निश्चितच नाही ! – ॲड. प्रकाश आंबेडकर