महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

जिकडे हे नेते जातात तिकडे खोक्यांचा विषय येणारच – छगन भुजबळ

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/प्रतिनिधी – जिकडे हे राजकीय नेते जातात तिकडे खोक्यांचा विषय येणारच नाही लोक विसरणार ना नेते विसरणार तसेच खासदारकी रद्द केली हा लोकशाहीवर हल्ला असून लोकशाहीच्या अंताकडे जाणारी गोष्ट आहे.तरी राहुल गांधी हे संपूर्ण देशात जाऊन आपले म्हणणे मांडणार असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकार यांनी विचारलेला प्रश्न उत्तर देताना बोलत होते.

कांदे विकले गेलेत खोक्यांमध्ये कांदे विकले गेले असा उपरोधिक टोमणा उद्धव ठाकरे यांनी सभेत लगवला होता याबाबत भुजबळ म्हणाले की सगळी कडेच पन्नास खोके एकदम ओके अस चालू असून जिकडे हे नेते मंडळी जानार तिकडे हा विषय येणारच लोक तसेच राजकीय नेते हे विसरणार नाही असे भुजबळ यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द केले याबाबत विचारले असते. भुजबळ म्हणाले की आमदार खासदार असल्यावरच लोकशाहीमध्ये बोलता व भांडता येतं अशातला भाग नाही. राहुल गांधी अथवा संजय राऊत यांची खासदारकी जरी रद्द केली तरी देखील ते लोकशाही मार्गाने संपूर्ण देशामध्ये आपले म्हणणे मांडू शकतील. आज गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदान केले. त्यांच्या वारसावर अशी कारवाई करणे म्हणजे लोकशाही वर हल्ला तसेच लोकशाहीच्या अनंताकडे चाललेली गोष्ट असल्याचे भुजबळ म्हणाले असून ही भाजपाच्या बाबतीत चांगली गोष्ट नसल्याचे यावेळी ते बोलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×