नेशन न्यूज मराठी टीम.
नंदूरबार/प्रतिनिधी – शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांना चांगली संधी होती परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच काम केले नाही.शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना जर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले असते तर आज गाव सुखी राहिले असते. कृषी मूल्य समिती आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नंदुरबारला बोलताना सांगितले. नंदुरबार जिल्हात एक लाख 65 हजार जमीन पडून आहे.बांबू लागवडीसाठी महाराष्ट्रात काम करीत असताना भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता नंदुरबार जिल्हात बांबू लागवड व्हावी ही माझी इच्छा आहे.नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन पडून असताना त्याच्या फायदा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होईल यासाठी शासनासोबत चर्चा केली आहे.आणि त्याच संबंधित दौरा केला असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सात लाख अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे आणि हे अनुदान पुढे वाढेल जर एवढे प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात आले तर जिल्ह्याच्या कायापालट होणार आहे.
भविष्यात बांबूची मागणी वाढणार आहे, बांबू साठी चांगले दिवस आले आहेत जर अर्धा महाराष्ट्र बांबू लागवड केली तरी बांबूची मागणी कमी होणार नाही म्हणून नंदुरबार जिल्हात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी असे पाशा पटेल यांनी सांगितले .कापूस व सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी दिल्लीला जाऊन चर्चा करणार आहे व कशाप्रकारे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे, त्यासोबतच खाजगी विमा कंपन्यांचा वरचढपणा वाढला आहे त्यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. सरकारने एलआयसी प्रमाणेच विमा कंपन्यांना सरकारच्या अधिपत्याखाली आणल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा फायदा होणार आहे असे पाशा पटेल यांनी सांगितले.