नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई मध्ये आयोजित एका भिमोत्सव जयंतीच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील , मनसे प्रवक्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. गुलाबराव पाटील यांनी खरंच प्रयत्न करावे, आम्ही त्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देतोय. इन्सिक्युरिटी वाढली की माणसं हिंसक होऊन अधिक हिंसकतेने बोलतात. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
तर मनसे प्रवक्त्यांनी केलेल्या टीकेवर एका वाक्यात उत्तर देत मी प्याद्यांवर बोलत नाही. त्यांची पत्रावर उत्तर देताना झालेली तारांबळ पाहून मजा येतेय.अशी बोचर टीका केली, या सोबतच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देत आहेत, म्हणजे त्यांनी हार मान्य केली आहे. एकनाथ शिंदे जाणार ही गुजरातच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी खरी आहे.
याचा दुसरा अर्थ म्हणजे महविकास आघाडीचाच माणूस मुख्यमंत्री होईल आणि शिंदे गट विरोधिबाकावर काय कुठेच असणार नाही. हे फडणवीसांनी मनोमन मान्य केले आहे. असाच याचा अर्थ होतो. अशी टीका करत सुषमा अंधारे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.