नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – अस्तगाव तालुका नांदगाव येथून ट्रॅक्टर मध्ये कांदे विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीमध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. मनमाड लासलगाव रस्त्यावरील चांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेत शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबासह गाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
अस्तगाव तालुका नांदगाव येथील शेतकरी अजय नानासाहेब उगले वय वर्षे 30 हे शेतकरी . कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर नंबर एम एच 41 डी 86 48 हा घेऊन प्रथम मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घेऊन गेले.परंतु तेथे कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे तो वडिलांशी चर्चा करून लासलगाव येथे कांद्याला जास्त भाव मिळेल. या अशापोटी तो ट्रॅक्टर घेऊन लासलगाव येथील मार्केटमध्ये जात असताना चांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात रस्त्यावरील खड्डा चुकवित असताना शेतकरी अजय उगले यांच्या हातातून ट्रॅक्टरची स्टेरिंग सुटल्याने ते खाली पडून त्यांच्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्या गेल्यामुळे तो जागीच मृत झाल्याचे माहिती समोर येत आहे. यावेळी तेथील नागरिकांनी त्याला बाहेर काढून व मनमाड उपजिल्हा रुग्णालय येथे औषध उपचारासाठी पाठवले होते. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.