नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
जळगाव/प्रतिनिधी – भाजपाचे मंत्री गिरीश महाजनांकडे वैद्यकीय खाते असतांना त्यांचे गायनॅक विभागाकडे अधिक लक्ष होते. हृदयविकार विभागाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना माझ्या हृदयविकाराच्या आजाराची माहिती नाही. गिरीश महाजन तुम्ही माझ्या आजाराची चौकशी करा खोटा निघाला तर तुम्ही मला जोडे मारा आणि खरा निघाला तर मी तुम्हाला जोडे मारीन अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजनांवर पलटवार केला आहे.
भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांची साठी बुध्दी नाठी झाली आहे. त्यामुळे त्यांना काहीच सुचत नाही. खडसे नावाची त्यांना कावीळ झाली आहे. वैद्यकीय विभाग असतांना महाजनांनी जे चाळे केले त्यामुळेच त्यांचे खाते गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी माझ्या आजाराचे कागदपत्र तपासावे. ते जर खोटे निघाले तर मी जोडे खायला तयार आहे अन्यथा त्यांनी जोडे खावे असे आव्हान दिले. महाजनांनी इतर विषयांपेक्षा कापसावरही बोलावे. संकटमोचक म्हणून मराठा समाज, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात मध्यस्थी केली. पण ती यशस्वी झाली नाही. मग हे कसले संकटमोचक? संकटमोचक म्हणून घ्यायचे आणि शेपूट घालून पळ काढायचा हे योग्य नाही. मी आता नव्या दमाने पुन्हा कामाला लागणार असून तुमचे उद्योग काय आहे हे सगळे बाहेर येणार आहेत. मी यमुनेच्या तीरावर बसून हवेत गोळीबार करणार नसल्याचेही आ. खडसे म्हणाले.