प्रतिनिधी.
डोंबिवली – महाराष्ट्रातले जिम बंद करून आता ६ महिने होऊन गेले. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने आता जिम पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.असं म्हणत जिम सुरु करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनीही केली आहे. राज्य शासनाने हॉटेल , रेस्टॉरंट, बार सुरु केले आहे. मात्र जिम सुरु करायला कोणत विज्ञान आडव येतय असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.
राज्य शासनाकडून बार रेस्टरोन्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असताना जिम मात्र अद्यापी बंदच आहेत. जीम चालक ८० टक्के मराठी तरुण आहेत. या तरुणांच्या साठी जिम चालू करणे गरजेचे असताना या जिम चालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या आकसातून तर राज्य सरकार जिम चालू करण्यास परवानगी देत नाही का? असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारने जिम चालू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास जिम चालकाकडून काढल्या जाणाऱ्या डंबेल्स आंदोलनाला मनसे पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. तर तिरुपती बालाजी मंदीर लोकडाऊन नंतर सुरू करण्यात आले आहे मात्र महाराष्टारतील मंदिरे सुरू करण्याबाबत शासन उदासीन आहे. मंदिरावर अनेक घटकांची उपजीविका अवलंबून असते यामुळे याचा विचार करून शासनाने मंदिरे सुरू करण्याबाबत विचार करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.