महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

कल्याण गुन्हे शाखेचा अवैध गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, तिघांना अटक

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – बदलापूर काटइ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेच्याय पथकाने तपास करताना हा गुटखा मलंग रोड वर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला व या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन ,गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल साडे सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

कल्याण गुन्हे शाखेने याप्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विराज हा या आधी देखील गुटक्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती, या गुप्त्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखा पथक पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×