नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील नव चैतन्य नगर गार्डनच्या विकास कामांसाठी सन्माननीय आमदार राजुदादा पाटील यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विकासकामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.२५ लाख निधी हा माझ्या खिशातला नसून हा सरकारचा पैसा आहे. काम होत असताना कामाकडे चागले लक्ष द्या आपली काम चांगली झाली पाहिजे असे आ. राजू पाटील म्हणाले त्याच बरोबर त्यांनी जागरूक नागरिकांचे कौतुकही केले.सगळ्यांना एकत्र घेऊन इथल्या विभागातील काम दर्जेदार कसे होतील याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी एम आय डी सी विभागातील नागरिकांना दिला. नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आमदार यांना गर्ह्याने मांडले असता लवकरच रस्ते चांगले कसे होतील यासाठी ही जे पाहिजे ते प्रयत्न करणार असही ते म्हणाले.
या सोहळ्याला डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी,जिल्हा संघटक हर्षद पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, प्रेम पाटील विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रितेश पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, प्रदीप चौधरी, शाखा अध्यक्ष सुरज शिंदे,श्रीमती खोत ताई महिला विभाग अध्यक्ष, श्रीमती ज्योती पाटील महिला शाखाध्यक्ष, श्री अनिल वालेकर वाहतूक सेना,शाखाध्यक्ष, श्री जतीन पाटील श्री रवि गरुडे विभाग अध्यक्ष, बबलू मोरे शाखाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.