नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नागपुर/प्रतिनिधी – चाईबासा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या ब्लास्ट मध्ये एक जवान शहीद झाला आहे. या संदर्भात बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, त्या ठिकाणी नक्षल विरोधी मोहीम सुरू आहे. तिथे ही घटना घडली आहे. तीन-चार दिवसांपूर्वी देखील एक अशी घटना घडली होती.
आमचे जवान आणि सीआरपीएफ जवान मिळून नक्षलवाद्यांचा पूर्ण सफाया करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा तो गड होता, तो गड पूर्णपणे उध्वस्त करण्यात आम्हाला यश आलेल आहे. जवान शहीद होतात, त्यामुळे दुःख होतं. अशा जवानांवर आम्हाला गर्व असल्याचं ते म्हणाले.