महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

राज ठाकरे यांची आम्हाला आजिबात आवश्यकता नाही – रामदास आठवले

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/Sv3boOiTWmc

शिर्डी/प्रतिनिधी – राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबध आहे मात्र त्यांची आमच्या युतीला गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. शिर्डी येथे मध्यामंशी एका पत्रकार परीषदेत ते बोलत होते. राज ठाकरे चागले वक्ते आहे त्यांच्या सभेला फार गर्दी असते पण त्यांना मत पडत नाहीत. शिवसेना,बीजेपी आणि आमची युती असताना आम्हाला राज ठाकरे यांची आजीबात आवश्यकता नाही असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले.

त्याच बरोबर मला एकट्याला मंत्री करून उपयोग नाही तर महामंडलातील पद आरपीआयला मिळावं असेही ते या वेळी म्हणाले.मंत्री पदाचा विस्तार करावा आणि आरपीआयला मंत्री पद मिळाले पाहिजे अशी इच्छाहि त्यावेळी त्यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्रा मध्ये एकट्याच्या बळावर यश मिळवणं मुस्किल आहे त्यामुळे येत्या लोकसभेमध्ये आमच्या पक्षाला तीन जागा मिळाव्यात आणि विधानसभा मध्ये देखील आम्हला जागा मिळाव्यात आशी इच्छाहि त्यांनी प्रकट केली.

27 मे ला ऑल इंडियाची मिटिंग शिर्डीत होणार आहे.असेही आठवले यांनी सांगितले.एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. एकनाथ शिंदे यांना चिन्ह मिळाले असून नाव देखील मिळाले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील त्यांच्या बाजूने लागेल असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.

शिवसेना फुटण्यामागे संजय राऊत उद्धव ठाकरे जबाबदार आहे. त्यांनी भाजपशी युती तोडली नसती तर हे सर्वकाही झाले नसते. असे बोलत विरोधकांवर टीका केली. आमची युती नरेंद मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 ची निवडणुका आम्ही जिंकणार व पुन्हा आमचे सरकार येणार पंतप्रधान मोदींचे नेतृत्व भक्कम आहे असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काही फरक पडणार नाही भारत आधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या साविधनामुळे जोडला गेला आहे असे बोलून कॉग्रेसवर सुद्धा आठवले यांनी टीका केली.

एकदा मी शिर्डीत मी हरलो आहे पण शिर्डीचा विकास करण्यासाठी मी पुन्हा उभा राहील…. शिर्डीच्या जनतेचा माझा पूर्ण विश्वस आहे आणि या वेळेला मी निवडून येईल असे बोलून आतःवले यांनी शिर्डीत पुन्हा खासदारकी लढविण्याची इच्छा बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×