नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – महाराष्ट्रात उन्हाळ्याचा पारा वाढत चालल्याने नागरिकांबरोबर वन्यजीव ही त्रस्त आहेत. यावर्षी उन्हाळा वाढल्याने अनेक नदी, तलाव आणि धरणे कोरडी पडली आहेत. उन्हाबरोबर गोंदिया शहराच्या विविध भागांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. गोंदियात पाण्याचा प्रश्न पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख धरणापैंकी सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला, देवरी तालुक्यातील शिरपूर आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह हे महत्त्वाचे धरण आहेत. पुजारी टोला धरणात 42.52 टक्के, शिरपूर धरणात 9.19 टक्के आणि इटियाहोड धरणात 25.40 टक्के येवढाच पाणी साठा उपलब्ध आहे. जिल्हात तिन्ही धरणांमध्ये सरासरी सध्या फक्त 19% पाणीसाठा उपलब्ध असल्याने गोंदिया जिल्ह्या वाशियांसाठी येणाऱ्या दिवसात पाण्याच्या मोठा बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच नागरिकांनी योग्य प्रकारे पाण्याचा वापर करावा तसेच पाण्याच्या अपव्य टाळावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले आहे.