Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

५६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला वॉण्टेड अब्दुल इराणी पोलिसांच्या जाळ्यात

कल्याण/प्रतिनिधी- वसई पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटाळीतील हैदर ईराणी याच्या खडकपाडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुसक्या आवळल्या असतानाच रविवारी ५६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व पोलिसांना हवा असणाऱ्या २२ वर्षीय अब्दुला संजय ईराणी उर्फ सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या १६ मोटरसायकली तसेच ६१ ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अब्दुला ईराणी याच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चैन स्नेचींग, जबरी चोरी, तसेच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. रविवारी खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस ईराणी वसाहतीत शिरले असता अब्दुल्ला ईरानी निदर्शनास आला असता त्याच्यावर पोलिसांनी झडप टाकली. मात्र सराईत गुन्हेगार असणाऱ्या अब्दुल्लाने दोन पोलिसांवर पलटवार केल्याची माहिती मिळून आली आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गायकर यांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा घटनेला दुजोरा दिला आहे.

खडकपाडा पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या सोळा मोटरसायकली तसेच ६१ ग्राम वजनाचे दागिने असे एकंदरीत १२ लाख १५ हजार किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ए.सी.पी. अनिल पोवार, व.पो.नि. अशोक पवार, पो.नि. शरद झिने, व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X