नेशन न्यूज मराठी टीम.
उस्मानाबाद / प्रतिनिधी – हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज उस्मानाबाद शहरात शालेय विद्यार्थांच्या सहभागातून वॉकेथॉन रॅली संपन्न झाली.
रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास अभिवादन करून करण्यात आला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरुन रॅली नेत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात आला.