महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

जागे व्हा आयुक्त,निषेधात्मक गाण्याद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केला निषेध

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/vkwQdCiLL_c

कल्याण- सलग पाचशे दिवस आंदोलन करून देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याने आज डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निबाळकर यांनी “जागे व्हा आयुक्त’ हे निषेधत्मक गाणं गात आंदोलन केलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर मुनींचा वेष परिधान करत निंबाळकर यांनी गाणं गात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेल्या ५०० दिवसांपासून अनधिकृत बांधककामावर कारवाइची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने आज त्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावार मुनींच्या वेशात आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी निषेधात्मक गाणं गायलं या गाण्याद्वारे लोकांचे लक्ष वेधले.

डोंबिवलीतील जैन प्रार्थनास्थळासह इतरही अनधिकृत बांधकामांबाबत आपण पालिका प्रशासनाकडे ५ वर्षांपासून पाठपुरावा करत असून पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ नागरिकांना दाखवण्यासाठी पालिका कारवाई करत आहे. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या आयुक्तांना जागं करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×