नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – गणेशोत्सव २० दिवसांवर येऊन ठेपला असून कल्याणातील गणपती कारखान्यात बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाप्पाच्या मूर्तीना विविध रंगातील आकर्षक कपड्यांचा साज चढवण्यात आला असून यामुळे या मूर्ती आकर्षनाचा केंद्र बनला आहे.
कल्याणमध्ये पीओपिच्या मूर्तीना पर्याय म्हणून शाडू माती, गोमय आणि लाल मातीच्या मूर्ती भक्तासाठी मागील १५ वर्षांपासून भक्तांना ई गणेशा उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या मिनल लेले यांनी यंदा कपड्यांचा साज दिलेल्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती भक्तासाठी उपलब्ध केल्या आहेत.
जसजसा गणेशोत्सव जवळ येत आहे तसे बाप्पाच्या मूर्ती बुक करण्यासाठी भक्ताची लगबग वाढली असून कारखान्यात सजलेल्या मूर्ती पाहून भक्त हरपून जात आहेत. कोणती मूर्ती आपल्या घरी न्यायची ही ठरवताना भक्ताची घालमेल वाढत आहे.
जरी काठाच्या कपड्यात सजलेल्या या गणपती बाप्पाच्या मूर्ती वेगवेगळ्या रूपात आणि आकारात काळा तलाव आणि संतोषी माता रस्त्यालगतच्या कारखान्यात भक्तांना आकर्षित करत आहेत.