Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

भीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवण

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नांदेड/प्रतिनिधी – अनेक वर्ष्यांपासून दुष्काळाच्या (Drought) झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक दिवशी झगडावे लागत आहे. विहिरी, नदी ,तलाव आणि जलस्त्रोत आटल्यामुळे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जिल्ह्यातील कंधार, मुखेड लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कंधार तालुक्यातील आनंद वाडी या गावातील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी मैलो मैल दूर भटकंती करावी लागत आहे. आनंदवाडी या गावातील लहान मुले आणि महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूरवरून पायपीट करण्याची वेळ आली आहे.

घोटभर पाण्यासाठी जनता आसुसलेली असल्यामुळे कोणताही धोका पत्करायला तयार आहेत. तीन-चार किलोमीटर दूर असलेल्या विहिरीत जीव धोक्यात घालून गावकरी पाणी काढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तालुक्यातील पाझर, तलाव आणि विहीर पूर्णतः आटल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शासनाने पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी येथील रहिवासीयांनी केली आहेत.

Translate »
X