नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – देशभरात लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून एकूण 17 लाख 82 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ,
या मतदानासाठी 1162 मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. तसेच या मतदानाकरिता 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले असून, पाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बुलढाण्यातील सावळा या गावामधील मतदान केंद्रावर जाऊन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि देशाला सुरक्षित ठेवेल या अशा उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन मतदारांनी केले आहे.