महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

सांगलीत लोकसभेसाठी मतदानाला सुरवात, मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

सांगली/प्रतिनिधी – राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदानाला सुरवात झाली आहे. सांगली मतदारसंघात प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. तब्बल 1830 मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. तर दहा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फोर्स फाटा ही तैनात करण्यात आला आहे. शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सांगलीमध्ये तीन पाटलांमध्ये चूरस आहे. आज मतदान राजा कोणाला कौल देणार आणि कुठला पाटील निवडून येणार हे मतदान पेटीत कैद होणार आहे. यावेळी मतदार राजाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे तसेच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला.

Translate »
×