महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

मतदारांनी शिवसेनेची लायकी दाखवून दिली भाजपा आ.गणपत गायकवाड यांची टीका

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा येथे उमेदवार उभे केले. मात्र  त्यांना नोटा पेक्षाही कमी मतदान झाले. यामुळे मतदारांनी शिवसेनेला लायकी दाखवून दिली अशी टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.

देशाच्या चार राज्यात भाजपला यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर.. कारण जे गोवामध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले मात्र, त्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मत मिळाली. त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिली आहे. अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

हा उत्सव विजयाचा, असून भाजपावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथे पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा निवडून दिलेल्या बद्दल कल्याणपूर्वेतील तिसाईहाऊस या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून विजयाचा आनंद आणि जल्लोष लाडू वाटून तसेच ढोल-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. यावेळी मोठ्या संखेने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×