महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
मुंबई लोकप्रिय बातम्या

राष्ट्रीयत्वात सर्वधर्म समभाव खऱ्या अर्थाने पहावा- अनिल देसाई

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरूआहे तर दुसरीकडे रमजान महिना असल्यामुळे संपूर्ण देशात मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय बांधव इफ्तार पार्टीत सामील होऊन सर्वधर्म समभावाचा संदेश देताना दिसत आहेत. इस्लाम धर्मात रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. मुस्लिम बांधव महिनाभर उपवास म्हणजेच ‘रोजा’ करतात. या दरम्यान ते सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत. हा महिना सर्व मुस्लिमांसाठी विशेष मानला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबईत रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत दक्षिण मध्य मुंबई मविआचे उमेदवार अनिल देसाई यांची मुख्य उपस्थिती होती.

यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना महाविकास आघडीचे उमेदवार अनिल देसाई म्हणाले “चंद्रकांत हंडोरे राज्यसभेचे सदस्य, राष्ट्रवादीचे मुबारक खान साहेब या सर्वांनी मिळून रमजान सारख्या पवित्र महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले ही बाब खूप आनंदाची आहे. या पवित्र उत्सवात मला सहभागी होण्याचा मान मिळाला ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच प्रमाणे पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व यात आपण सर्व धर्म समभाव पहावा त्या अनुषंगाने आम्ही काम करण्याचा विडा उचललेला आहे. या पक्षात खऱ्या अर्थानं सलोखा, समभाव पाहायला मिळतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात समाज कसा असावा हे सांगितले आहे. याच उत्तम उदाहरण येथे आल्यावर बघायला मिळाले आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले कि लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो मतदान. सुजाण नागरिकांना हे कळते आपले बहुमूल्ये मत हे कुणाला द्यायचे ते आणि तो आपला आधिकार योग्यरीत्या बजावेल. देशाची परिस्थिती, महाराष्ट्राची परिस्थिती व सुरू असलेलं राजकारण बघता लोकप्रतिनिधी हा समस्यांची जान असलेला हवा. लोकांना लोकप्रतिनिधी हा आपल्यातलाच असावा असे वाटत असते त्याचबरोबर तो नेहमी आपल्या अडचणींच्या वेळी धाऊन येणारा असावा. त्याने जनतेच्या समस्या जाणून घ्यायल्या हव्या व तो जनतेला पुढे घेऊन जाणारा असावा.” असे ते म्हणाले.

तसेच मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी अनिल देसाई यांनी आवाहन केले ते म्हणाले “भारत निवडणूक आयोग ‘फ्री एण्ड फिअर’ वातावणात निवडणूक करत आहे, मात्र खऱ्या अर्थाने निवडणूक ‘फ्री एण्ड फिअर’ वातवरणात होतेय का याचं निवडणूक आयोगाकडे नियोजन असायला हवं.” असेही यावेळी ते म्हणाले.

अनिल देसाई यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वधर्म समभाव आहेत आणि आपण प्रत्येक धर्माचा आदर करायला हवा. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरी केल्यामुळे एकमेकांविषयी प्रेमाची, आदराची भावना वाढते तसेच समाजात जात-धर्म यामुळे जी दरी निर्माण झालेली आहे ती कमी होण्यास मदत होते. असा संदेश अनिल देसाई यांनी या वेळेस जनतेला दिला.

Translate »
×